प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या सारख्या सुजान गणेश भक्तांसमोर अहवाल रूपाने मनोगत व्यक्त करण्यास आम्हाला अत्यानंद होत आहे. मागील २८ वर्षापासून कुठल्याही प्रकारचे विघ्न न येता विभागातील व विभागाबाहेरील दानशूर व्यक्ती, जाहिरातदार व हितचिंतक, देणगीदार व रहिवाशी यांच्या मोलाच्या आर्थिक सहकार्याने तसेच मंडळाच्या कार्यकर्त्याच्या अविरत परिश्रमामुळे मंडळाने उत्सवाची परंपरा कायम राखली आहे .
मंडळाने 'नवी मुंबई शिवसेना गणेश दर्शन' स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ऐरोली विभाग प्रथम पारितोषिक, दोन वर्षे मंडळाने 'लोकसत्ता-माणिकचंद' या गणेशदर्शन ऐरोली स्पर्धेतील संपूर्ण नवी मुंबई व पनवेल परिसरात "प्रथम पारितोषिक" मिळवण्याचा मान संपादन केला. त्याच प्रमाणे रबाले पोलिस स्टेशन व लायन्स क्लब यांच्या सयुंक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या गणेश दर्शन स्पर्धेतील प्रथम पारितोषिक सतत पाच वर्षे मिळवून फिरता चषक आबाधित राखला. तसेच गतवर्षीचा 'नवी मुंबई आयुक्तालया' तर्फे , रबाळे पोलीस हद्दीतील सर्वोत्कृष्ठ गणेशोत्सव मंडळ / आकर्षक मूर्ती / देखावा / सामाजिक उपक्रम या संदर्भात प्रथम क्रमांक देखील आपलया मंडळास मिळाला आहे. याचे प्रमुख श्रेय आमच्या मंडळाचे पदाधिकारी सजावटकार श्री. प्रवीण नार्वेकर यांना जाते .उत्सवाचा राहिलेला निधी तसेच गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मिळणारी देणगी , आजीव सभासद निधी , स्वेच्छा वर्गणी आणि विभागातील व विभागाबाहेरील दानशूर व्यक्तीकडून वस्तू रूपाने मदत घेऊन श्रीगणेश मंदिराची उभारणी करण्यात आली. मंडळाच्या वतीने रूम न. क़्यु -६६ , से. ४ येथे मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते स्व. महेश गांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृतपत्र वाचनालय चालू करण्यात आले आहे. विभागातील मुलांच्या कला, क्रीडा , शैक्षणिक गुणांना चालना देण्याची तसेच विविध समाज उपयोगी , उपक्रम राबविण्याची परंपरा राबविली आहे .
मंडळास सदेव मदत करणारे मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष श्री. मधुकर परब , आमचे सर्वे वर्गणीदार , हितचिंतक , जाहिरातदार , व्यापारी बंधू , मूर्तिकार - श्री. अशोक म्हात्रे , (गणेश चित्र शाळा, चिंचपोकळी , मुंबई.) श्री. विश्वनाथ जगदाळे , मा. श्री. विजय चौगुले साहेब-विरोधी पक्ष नेता न.मुं.म.पा , मा. श्री मनोहर मढवी साहेब - नगरसेवक , ad.जब्बार खान , समाजसेविका - कु. सिदरा अ. जब्बार खान , समाजसेवक - शेखर घोगरे , समाजसेवक - श्री. राजेश धनावडे , श्री. ओमनाथ मढवी , श्री. विशाल गांधी , सिडको , नवी मुंबई महानगरपालिका , एम.एस.ई.बी. , अग्निशमन दल, रबाळे पोलीस स्टेशन , समीर साळवी , लायन्स क्लब तसेच मंडळास सहकार्य करणारे सर्वे रहिवाशी यांचे अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद !
**आपले स्नेहांकित**
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , से. ४ , ऐरोली पुरस्कृत
शिवगर्जना क्रीडा मंडळ